फिरोदिया करंडक आंतर महाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा


फिरोदिया करंडक- उत्स्फूर्त भावनांचा तरल कलाविष्कार! गेली ३६ वर्षे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर अधिराज्य गाजवणारी स्पर्धा! तरुण मनातल्या खर्‍या भावनांचं खरं प्रकटीकरण आणि ते देखील एवढ्या अविष्कार-वैविध्याने घडवायची संधी फिरोदियाच्या रंगमंचावर मिळते आणि हेच या स्पर्धेच खास वेगळे आहे


आयुष्यात घडणारे नेहमीचे प्रसंग जेव्हा तरुण कलाकार सादर करतात तेव्हा ते नुसतेच सादरीकरण नसते. ते त्या प्रसंगांच्या मागची मानवी जीवनातल्या भाव-भावनांची आशयघनताही अधोरेखित करीत असतात. थक्क करायला लावणारी विचारशक्तीही त्या आशायाघना आविष्कारामागे दिसत असते. विद्यार्थ्यांमधे असणारी अफाट संवेदनशीलता, प्रखर जाणीव शक्ती आणि अखंडित उर्जा ह्यांचा प्रत्यय सर्वांनाच त्यावेळी येत असतो. सातत्याने असे आशयघन अविष्कार फिरोदिया करंडक स्पर्धेत दिसून येत आहेत, आणि हेच ह्या स्पर्धेचं हे बलस्थान आहे


 लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नृत्य, संगीत, नाट्य, शिल्पकला, चित्रकला या सगळ्या बरोबरच sand animation, UV lights सारखे तांत्रिक कलाविष्कार आपल्याला ह्या स्पर्धेत बघायला मिळतात. हे सर्व करणाऱ्या कलाकारांची मोट बांधून प्रत्येकाचे स्वभाव, ईगोज सांभाळत, फिरोदिया करणं, ही सोपी गोष्ट मुळीच नाही! खरे तर ही कसरतच!


दरवर्षी स्पर्धेत भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांची-महाविद्यालयांची संख्या वाढत आहे, त्या ही पेक्षा कैक पटीने, स्पर्धेचे चाहतेही वाढत आहेत. फिरोदियाच यश त्यांच्यातच सामावलेल आहे.

Schedule for the Day

clock
Details
9:30 AM

1:00 PM

4:30 PM

Contact Us

Contact Us

Indu Banglow,Plot No 8,
Khare Wadi Society,
Near Pragati Vidyalay,
Behind Santosh Hall, Anandnagar
Sinhagad Road Pune